

Mugdha Karnik Under Fire for Comments on Vitthal Devotees, Apology Sought
sakal
पंढरपूर : पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केली आहेत. वारकरी संप्रदाय, संत परंपरा तसेच श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. डॉ. कर्णिक यांच्या या वक्तव्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मंदिर समितीने पत्रक प्रसिद्ध केले आहे.