बार्शी तालुक्‍यात नवीन 25 कोरोनाबाधित अन्‌ दोघांचा मृत्यू

Corona
Corona
Updated on

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये भरच पडताना दिसत असून, गुरुवारी 346 प्राप्त झालेल्या स्वॅब व रॅपिड अँटिजेन तपासणी अहवालामध्ये 25 जण कोरोनाबाधित आढळले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यातील मृतांची संख्या एकूण 44 वर पोचली आहे तर बाधितांची एकूण संख्या एक हजार 181 झाली असल्याची माहिती तहसीलदार डी. बी. कुंभार यांनी दिली. 

गुरुवारी शहरातील 254 व ग्रामीणमधील 92 अहवाल असे 346 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 16 व ग्रामीणमधील 9 असे 25 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. मृतांमध्ये शहरातील 23 व ग्रामीणमधील 21 असे 44 जण आहेत. शहरातील 230 रॅपिड अँटिजेन अहवालात 15 जण पॉझिटिव्ह तर 215 जण निगेटिव्ह आढळले. ग्रामीणमधील 80 टेस्टमध्ये 8 जण पॉझिटिव्ह व 72 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शहरातील 238 व ग्रामीणमधील 83 असे 321 जण निगेटिव्ह आढळले आहेत. शहरात 673 तर ग्रामीणमध्ये 488 असे एकूण एक हजार 181 जण कोरोनाबाधित आहेत. शहरातील मंगळवार पेठेत तीन, सनगर गल्लीत दोन, राऊत गल्लीत तीन, वाणी प्लॉट दोन, सोलापूर रोड एक, भवानी पेठ एक, जैन मंदिराजवळ एक, फुले प्लॉट एक, जावळी प्लॉट एक, लक्ष्मीनगर एक असे 16 पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागातील शेळगाव आर तीन, चिंचोली, मळेगाव, उंबरगे, धामणगाव येथे प्रत्येकी एक तर घारी येथे दोन अशा नऊ रुग्णांची भर पडली आहे. शहरातील 251 व ग्रामीण भागातील 148 अशा 399 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 718 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत. यामध्ये शहरातील 399 तर ग्रामीण भागातील 319 जण आहेत. 

सर्दी, खोकला येत असलेले शहरात 64 रुग्ण असून ग्रामीण भागात 50 जण आढळले आहेत तर शहरात सारीचा एक रुग्ण, ग्रामीणमध्ये 7 रुग्ण आढळले आहेत. शहरात 102 तर ग्रामीण भागात 58 असे 160 प्रतिबंधित क्षेत्र सुरू आहेत. 24 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार डी. बी. कुंभार यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Marathi News Esakal
www.esakal.com