

Selection Under Dr. Babasaheb Ambedkar Model School Scheme
Sakal
माढा : माढयातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी नुकतीच मान्यता दिल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील या जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक प्रशालेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे माढयातील ९०० हून अधिक पटसंख्या असलेल्या प्रशालेचा चेहरामोहरा बदलणार आहे. राज्यातील ४०५ व सोलापूर जिल्ह्यातील १३ शाळांचा यात समावेश आहे.