
-भारत नागणे
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ता. २३ राेजी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येत आहेत. यावेळी ते बहुचर्चित कॉरिडॉरबद्दल काही महत्त्वाच्या घोषणा करतीलच. कारण, एकादशीनंतर लगेचच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक झाली. कॉरिडॉर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. काशी आणि उज्जैन येथील कॉरिडॉरच्या धर्तीवर दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर (विकास आराखडा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉरिडॉरमध्ये काय काय असणार याची उत्सुकता राज्यात वाढत चालली आहे.