ऍड. गायकवाड व कवयित्री बहिरट यांचे कोरोना जनजागृतीचे द्विशतक ! संकट टळेपर्यंत ठेवणार उपक्रम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Janjagruti

कोरोना संदर्भात समाज माध्यमाद्वारे जनजागृती करण्याचे काम येथील ऍड. वर्षा गायकवाड आणि प्रसिद्ध साहित्यिका लता बहिरट या दोघी करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला सलग 200 दिवस पूर्ण झाले असून, यापुढेही कोरोनाचे संकट टळेपर्यंत त्या जनजागृती करत राहणार आहेत. 

ऍड. गायकवाड व कवयित्री बहिरट यांचे कोरोना जनजागृतीचे द्विशतक ! संकट टळेपर्यंत ठेवणार उपक्रम सुरू

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना संदर्भात समाज माध्यमाद्वारे जनजागृती करण्याचे काम येथील ऍड. वर्षा गायकवाड आणि प्रसिद्ध साहित्यिका लता बहिरट या दोघी करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला सलग 200 दिवस पूर्ण झाले असून, यापुढेही कोरोनाचे संकट टळेपर्यंत त्या जनजागृती करत राहणार आहेत. 

कोव्हिड 19 या महामारीची सुरवात झाल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी काही आवश्‍यक गोष्टींचे अनुपालन समाजातील लोकांकडून झाल्यास साखळी तोडणे सुलभ होत आहे. त्यासाठी जनजागृती हा उत्तम पर्याय आहे. काव्य मनोरंजन व भित्तिपत्रके या समाज माध्यमांचा उपयोग करून जनजागृती केल्यास प्रभावी ठरेल, हे लक्षात घेऊन कोव्हिड योद्धा ऍड. वर्षा गायकवाड व सुप्रसिद्ध साहित्यिका व कवयित्री लता बहिरट या दोघी अभिनव उपक्रम राबवत आहेत. 

लघु काव्यात दिलेला संदेश लोकांच्या मनात दीर्घकाळ राहतो, हे सूत्र लक्षात घेऊन कोव्हिड योद्धा ऍड. वर्षा गायकवाड व कवयित्री लता बहिरट या दोघींनी मिळून एक जनजागृतीपर लघु काव्य प्रसिद्ध केले. ते दृक्‌श्राव्य स्वरूपात ऍड. वर्षा गायकवाड यांनी सादर करून सामाजिक माध्यमाद्वारे व्हायरल केले. 

सातत्याने सलग दोनशे दिवस ही लघु काव्ये दृक्‌श्राव्य माध्यमातून प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे कोव्हिड नियमाचे अनुपालन करण्यासाठी जनजागृतीच्या कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. या उपक्रमाच्या द्विशतकदिन महोत्सवाबद्दल दोघींचे कौतुक होत आहे. विशेषतः पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन ढोले व नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी विशेष कौतुक केले आहे. 

महामारीचे संकट टळेपर्यंत हा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा मानस लता बहिरट व ऍड. गायकवाड यांनी व्यक्त केले आहे, अशी माहिती ऍड. बी. ए. बहिरट यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top