tahsildar sachin mulik
sakal
मोहोळ - दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असून, ज्या शेतकऱ्यांनी "फार्मर आयडी" काढला आहे अशा शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळणार आहेत. त्यासाठी शासनाने एक "सॉफ्टवेअर" विकसित केले असून, त्या माध्यमातून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत.त्यासाठी 50 कोटी रुपयांचे वाटप होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.