esakal | टेस्ट वाढल्यानंतर रुग्णही वाढले ! शहरात 32 तर ग्रामीणमध्ये आढळले 527 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

टेस्ट वाढल्यानंतर रुग्णही वाढले ! शहरात 32 तर ग्रामीणमध्ये आढळले 527 रुग्ण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

आज (मंगळवारी) टेस्टिंग वाढविल्यानंतर रुग्णसंख्याही वाढली आहे. शहरात एक हजार 980 संशयितांची टेस्ट झाली असून त्यात 32 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सोलापूर : ग्रामीण भागातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट अजूनही कमी झालेली नाही. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. तरीही टेस्टिंग कमी करण्यात आले असून, आज (मंगळवारी) टेस्टिंग वाढविल्यानंतर रुग्णसंख्याही वाढली आहे. शहरात एक हजार 980 संशयितांची टेस्ट झाली असून त्यात 32 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ग्रामीणमध्ये आठ हजार 49 संशयितांमध्ये 527 पॉझिटिव्ह आले असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (After the increase in tests, the number of corona patients in Solapur city and district also increased)

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी !

शहरातील प्रभाग क्रमांक तीन, 21, 24 आणि 25 हे सातत्याने प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. तरीही त्या ठिकाणी ठोस उपाययोजनांतून संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. आज (मंगळवारी) याच प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे प्रभाग क्रमांक एक, पाच, सहा, प्रभाग क्रमांक आठ ते 16 आणि प्रभाग क्रमांक 18 व 19 मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे, आज ग्रामीण भागातील करमाळ्यात 43, मंगळवेढ्यात 32, मोहोळ तालुक्‍यात 23, उत्तर सोलापुरात 13, दक्षिण सोलापुरात 20 रुग्ण वाढले असून या तालुक्‍यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर चिंतेची बाब म्हणजे अक्‍कलकोट तालुक्‍यात 26, बार्शीत 82 आणि पंढरपूर तालुक्‍यात रुग्ण वाढले असून या तिन्ही तालुक्‍यातील प्रत्येकी चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माढ्यात 79 तर सांगोल्यात 19 रुग्ण वाढले असून त्या ठिकाणच्या प्रत्येकी दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 108 रुग्ण आढळले असून, पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नियमांचे पालन तंतोतंत केले जात नसल्याने ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही "जैसे थे'च आहे.

हेही वाचा: रुग्णवाढीनंतरही ग्रामीणमध्ये घटले टेस्टिंग ! जिल्ह्यात 5116 चाचण्या

जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती

  • एकूण टेस्टिंग : 14,51,409

  • एकूण पॉझिटिव्ह : 1,52,124

  • बरे झालेले रुग्ण : 1,42,410

  • एकूण मृत्यू : 3,997

  • उपचार घेणारे रुग्ण : 5,717

रुग्णाच्या संपर्कातील दहा जणांचीच टेस्ट

कडक निर्बंधांपूर्वी पॉझिटिव्ह एका रुग्णाच्या थेट संपर्कातील किमान 20 ते 30 संशयितांची कोरोना टेस्ट केली जात होती. कडक लॉकडाउनमुळे विनाकारण घराबाहेर फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश लोक घरातच असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता एका रुग्णाच्या संपर्कातील किमान दहा जणांचीच टेस्ट केली जात आहे. दुसरीकडे, को-मॉर्बिड रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही कमी झाल्याने टेस्टिंग कमी होत आहे, असे आरोग्य विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण गावभर फिरून घरी येत असतानाही प्रशासनाने तसा तर्क लढविल्याने रुग्ण वाढत असल्याचे बोलले जात आहे.

loading image