चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी !

चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी
Sharad Pawar
Sharad PawarCanva

शरद पवार हे नाव महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे आहे. गेल्या 50 वर्षात शरद पवार नेमके कसे आहेत हे कोणालाच कळले नाही.

सोलापूर : शरद पवार (Sharad Pawar) हे नाव महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे आहे. गेल्या 50 वर्षात शरद पवार नेमके कसे आहेत हे कोणालाच कळले नाही. त्यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नसल्याने त्यांची अतिशय हुशार मात्र गूढ असे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा नेहमी बोलून दाखवत असतात; मात्र चंद्रकांत पाटलांच्या आधी सांगोल्याच्या प्राध्यापकाने शरद पवारांवर पीएचडी केली आहे, ते आहेत सांगोला तालुक्‍यातील खिलारवाडी येथील डॉ. प्रा. दत्तात्रय काळेल. (Dr. Pro. Dattatraya Kalel) (Before Chandrakant Patil, Sangola professor did his PhD on Sharad Pawar)

Sharad Pawar
कोरोनामुळे 4500 बालके झाली अनाथ ! राज्य सरकार करणार अनाथ बालकांच्या शिक्षणाचा खर्च

डॉ. प्रा. दत्तात्रय काळेल यांनी सहा वर्षांच्या सखोल अभ्यासातून शिवाजी विद्यापीठाला "आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन, एक चिकित्सक अभ्यास' हा प्रबंध सादर केला आहे. डॉ. काळेल हे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत. शरद पवार यांच्यावर पीएचडी केलेले प्रा. डॉ. काळेल यांच्याकडे शरद पवारांच्या स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांनी सांगितले, की शरद पवार हे एक गूढ व्यक्तिमत्त्व असून, त्यांचा स्वभाव म्हणजे एक दैवी शक्तीच आहे.

प्रा. डॉ. काळेल म्हणतात, शरद पवार यांच्या राजकारणाचा अंदाज भल्या-भल्यांना आलेला नाही. त्यांचा स्वभाव असा आहे, की त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून येत नाही. एवढंच काय वहिनीसाहेबांनासुद्धा शरद पवारांचा स्वभाव कळू शकला नाही. ते एक गूढ व्यक्तिमत्त्व आहे. कठीण प्रसंगी परिस्थितीचं भान ठेवूनच कोणताही निर्णय आत्मविश्‍वासपूर्वक घेतात; मग त्यात फायदा होवो अथवा नुकसान, याचा ते विचार करत नाहीत. पण स्वत:च्या मनाला वाटलं त्या पद्धतीने निर्णय घेतात. पुलोदचा प्रयोग आणि महाविकास आघाडीची निर्मिती यात बरंचसं साम्य आहे, यावरून गेल्या चाळीस वर्षांनंतरही पवारांचं राजकारण समजून घेण्यास अनेक पक्ष सपशेल फेल ठरले आहेत, हेच यावरून दिसून येते.

प्रा. डॉ. काळेल पुढे म्हणाले, शरद पवार यांच्यावर पीएचडी करताना पुलोद मंत्रिमंडळावर भर दिला. याबाबत त्यांना भेटायचा योग आला. त्यांच्यावर पीएचडी करतोय म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, की "करा व वास्तव मांडा.' पवारांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, मोठा माणूस असूनसुद्धा गावाकडून आलेल्या व्यक्तीशी आत्मीयतेने बोलणं. मी ग्रामीण भागातील आहे. पहिल्या भेटीनंतर दुसऱ्या भेटीत त्यांनी मला लगेच नावानिशी ओळखलं, हा त्यांचा वेगळाच गुण म्हणावा लागेल.

पुणे येथील बृहन्‌महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत असताना 1961 मध्ये पवार यांनी एका कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे केली व यशवंतराव चव्हाण यांना कार्यक्रमाला आणलेही. त्या वेळी वाद-विवाद स्पर्धेवेळी शरद पवार यांची वक्तृत्वशैली यशवंतराव चव्हाणांना आवडली व तेव्हापासून त्यांनी शरद पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार राजकारणात आले व 1967 मध्ये बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी पुणे येथील ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली होती.

Sharad Pawar
दुसऱ्या लाटेत 13 जिल्हे हॉटस्पॉट ! वाढले 34.90 लाख रुग्ण

शरद पवार यांच्या तरुणपणी म्हणजे 1978 ला त्यांनी जवळजवळ समविचारसरणीचे छोटे-मोठे सात पक्ष एकत्र आणून पुलोदचे सरकार स्थापन केले. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh), निहाल अहमद (Nihal Ahemad), एन. डी. पाटील (N. D. Patil), शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) अशा मातब्बर नेत्यांची मोट त्यांनी मांडली व पुलोदची सत्ता आणली. 2020 मध्येही शिवसेना- भाजप युतीची काडीमोड झाल्यावर शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी निर्माण केली. पवारांचे व बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध मैत्रीचे होते. देशस्तरावर महाराष्ट्राला संधी मिळावी असा त्यांचा दृष्टिकोन होता. बाळासाहेबांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना साथ देत राजकारणातील मुरब्बी शरद पवार यांनी 2020 मध्ये शिवसेना, कॉंगेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी मोट बांधून महाविकास आघाडीची स्थापना केली. पुलोदचा प्रयोग आणि महाविकास आघाडीची निर्मिती यात बरंचसं साम्य दिसून येतो. हे केवळ शरद पवारांनाच जमतं.

पवारांचे नेतृत्व व्यापक असून, देशपातळीवरही त्यांचे अनुभवी नेतृत्व सर्वमान्य आहे. आता ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे प्रादेशिक पक्षांचे नेते सतत प्रयत्न करतात, की तिसरी आघाडी किंवा संयुक्त सरकार स्थापन करण्यासंदर्भात पवारांनी पुढाकार घ्यावा. एकंदरीत वातावरण असेच आहे.

शेवटी प्रा. डॉ. काळेल म्हणतात, पवारांचा विषय खूपच व्यापक आहे. किती जरी लिहिलं तरी ते कमीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com