esakal | विधी अभिप्रायानंतरच 'सिद्धेश्‍वर'च्या 'चिमणी'ची पुढील कारवाई!
sakal

बोलून बातमी शोधा

विधी अभिप्रायानंतरच 'सिद्धेश्‍वर'च्या 'चिमणी'ची पुढील कारवाई!

मक्‍तेदाराची नेमणूक करताना विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा, असा ठराव महापालिकेने सभागृहात केला आहे.

विधी अभिप्रायानंतरच 'सिद्धेश्‍वर'च्या 'चिमणी'ची पुढील कारवाई!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची (Shri Siddheshwar Sugar Factory, Solapur) अनधिकृत चिमणी पाडकामासंबंधी मक्‍तेदाराची नेमणूक केली आहे. मक्‍तेदाराची नेमणूक करताना विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा, असा ठराव महापालिकेने (Solapur Municipal Corporation) सभागृहात केला आहे. त्यानुसार चिमणी पाडकामाचा विषय विधी अभिप्रायासाठी ठेवण्यात आला आहे. अभिप्राय आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे (Vijay Khorate) यांनी दिली.

हेही वाचा: दुपारी 1.50 पर्यंत करा गणेशाची स्थापना : पंचांगकर्ते मोहन दाते

श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणी पाडकामाचा विषय 2014 पासून रेंगाळत आहे. सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी हा विषय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला. चिमणी उभारण्यासाठी विमानतळ प्राधिकरण व चिमणी बांधकामासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, कारखान्याकडून कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चिमणी पाडण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली. मक्‍तेदाराची नेमणूक करण्यात आली, त्यास महापालिका सभागृहाची मान्यताही घेण्यात आली आहे. मात्र, सभागृहाने चिमणी पाडकामापूर्वी विधी विभागाचा अभिप्राय घेण्याची अट घातली. त्यामुळे हे प्रकरण आता विधी विभागाकडेच अद्याप प्रलंबित आहे. अभिप्रायानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचेही अतिरिक्‍त आयुक्‍त खोराटे यांनी सांगितले.

हेही वाचा: पंढरपूरकरांना दिलासा! कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत निम्म्याने घट

डॉ. आडकेंची अवमान याचिका फेटाळली

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडकामाबाबत डॉ. संदीप आडके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली अवमान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत 90 मीटर उंचीच्या को-जनरेशन चिमणीच्या पाडकामात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्‍त पी. शिवशंकर, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ सोलापूर यांच्या विरोधात डॉ. आडकेंनी ही अवमान याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या अवमान याचिकेतील कलमानुसार अवमान आदेश होऊ शकत नसल्याचा निर्वाळा देत याचिका फेटाळली आहे.

loading image
go to top