
सोलापूर : विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संपावर गेल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर २२ दिवस कृषी कार्यालयाकडील विविध कामे खोळंबली होती. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे ते बुधवार (ता. २८) पासून कामावर रुजू झाले आहेत. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासह खरीप मोहिमेला वेग आला आहे.