सोलापूर : प्रास्तावित आहिल्यादेवी स्मारकाने शहीद किसन माने चौकाचे चित्र बदलणार

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 12 फूटी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी चबुतरा करण्यात आला
राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक
राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकsakal

मंगळवेढा : शहरांमध्ये लोकसहभागातून सुरू सुरू करण्यात येत असलेल्या चार प्रास्ताविक पुतळ्यामुळे भविष्यात शहरांमध्ये पर्यटन वाढीस चालना मिळणार असताना शहीद किसन माने चौकात उभा करण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी पूर्णाकृती पुतळ्याने या चौकाला देखणे स्वरूप प्राप्त होणार आहे.

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक
तरुणांना जॉबची सुवर्णसंधी! फेअरपोर्टलचे कार्यालय आता पुण्यात

नगराध्यक्ष अरुणा माळी, पक्षनेते अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले व त्यांच्या इतर सहकारी नगरसेवकांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या नगरोत्थान विकास योजनेतून बोराळे नाका परिसरातील कुंभार तलाव सुशोभीकरणासाठी 52 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली त्यामध्ये तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. वेगळ्या प्रकारच्या रोपांची लागवड,सरंक्षित भिंत,सायकल ट्रक,पादचारी ट्रॅक करण्यात आला. घाणीचे साम्राज्य असलेल्या परिसराला पालिकेने वेगळे रूप प्राप्त करून दिले.

एका बाजूला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 12 फूटी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी चबुतरा करण्यात आला. पुतळा उभारण्याचे काम लोकसहभागातून करण्यासाठीचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले.त्यासाठी नगरसेवक अनिल बोदाडे,तानाजी खरात, माजी सभापती प्रदीप खांडेकर,धनाजी गडदे,बापू मेटकरी,रवीकिरण कोळेकर, या बांधवांनी यामध्ये पुढाकार महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीनंतर या चौका बरोबर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे.

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक
SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा

लोकसहभागातून उभा करण्यात येणार्‍या पुतळ्या बरोबर शिल्पसृष्टी उभारण्यासाठी जवळपास 30 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ज्यांना देणगी द्यावयाची आहे त्यांनी अहिल्यादेवी बहुद्देशीय संस्थेचे बँक ऑफ महाराष्ट्र मंगळवेढा शाखेतील खाते क्रमांक 60394963601 या खात्यावर रोख,फोन पे व्दारे जमा करावी.

- प्रदीप खांडेकर संयोजक स्मारक समिती

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला राजमाता अहिल्यादेवीच्या पुतळ्याचा प्रश्न आपल्या कारकीर्दीत मार्गी लागला.या पुतळ्याच्या अनुशंगाने सुशोभीकरण व पुतळा उभारणीत योगदान देण्याचे भाग्य मला मिळाले.शहरवासियांसाठी हा पुतळा भविष्यात प्रेरणादायी ठरणार आहे.

- अरूणा माळी नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com