सोलापूर-पुणे महामार्गावरुन दिसेल अहिल्यादेवींचे स्मारक। स्मारकामागे १५७ फूट उंचीचा टॉवर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारले जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात एक कोटी ७७ लाखांचा निधी मिळाला आहे. पुढील १५ दिवसांत निविदा उघडून मक्तेदार अंतिम केला जाणार आहे.
 solapur university
solapur university esakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारले जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात एक कोटी ७७ लाखांचा निधी मिळाला आहे. पुढील १५ दिवसांत निविदा उघडून मक्तेदार अंतिम केला जाणार आहे. एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

 solapur university
संजीव पलांडे, कुंदन शिंदे, सचिन वाझेला सात दिवसांची सीबीआय कोठडी

स्वतंत्र जिल्ह्यासाठी सोलापूर विद्यापीठ स्थापन झाले असून, आता विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव देण्यात आले. अहिल्यादेवींच्या कामाचा गौरव व्हावा म्हणून विद्यापीठात त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्त केली. सुरवातीला अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय तत्कालीन स्मारक समितीने घेतला होता. पण जयंती, पुण्यतिथीला पुष्पहार अर्पण करताना वादविवाद निर्माण होऊ नयेत म्हणून त्यात पुन्हा बदल करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात बदल सुचविला आणि हातात शिवलिंग घेतलेला अहिल्यादेंवीचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आर्किटेक्चरने डिझाइन तयार केले. विद्यापीठ प्रशासनाने ते डिझाइन आता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यानुसार आता बांधकाम विभागाने त्याची निविदा प्रसिद्ध केली असून निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर मक्तेदार निश्चित करून कामाला सुरवात केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे यांनी दिली.

 solapur university
आरटीई प्रवेशाच्या शाळानिहाय याद्या जाहीर

महामार्गावरून दिसेल स्मारक
हिरज रोडवरील विद्यापीठाच्या जमिनीवर नवीन प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन उभारले जात आहे. त्यासमोर अहिल्यादेवींचे स्मारक साकारण्यात येणार आहे. खुले स्टेडिअम, बगीचा, चबुतरा आणि स्मारकामागे तब्बल १५७ फूट उंचीचा टॉवर उभारला जाणार आहे. मुंबइ विद्यापीठाच्या धर्तीवर हा टॉवर असेल, पण त्याहून अधिक उंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकामागील टॉवरची असणार आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून हे स्मारक दिसणार आहे, हे विशेष.

 solapur university
भाजप-मनसे युती पक्की? फडणवीसांचे राज ठाकरेंच्या भेटीचे संकेत

निधीमुळे थांबणार नाही काम
विद्यापीठातील राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य सरकारने १४ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला असून स्मारकासाठी विद्यापीठातूनही निधी मिळणार आहे. त्यामुळे निधीविना स्मारकाचे काम थांबणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटला हे काम आले असून ३१ मे २०२३ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करून पुढील वर्षी अहिल्यादेवींच्या जयंती दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी, स्मारकाच्या भूमिपूजनालाही अनेकांची उपस्थिती असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com