भाजप-मनसे युती पक्की? फडणवीसांचे राज ठाकरेंच्या भेटीचे संकेत

मनसेच्या मेळाव्यानंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण
Raj Thackeray Devendra Fadnavis
Raj Thackeray Devendra Fadnavisesakal

गडचिरोली : मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर (MNS Padava Melava) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) भाजप आणि मनसेच्या युतीबाबत (BJP-MNS alliance) पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी देखील राज ठाकरे यांच्या भेटीचे संकेत दिले आहेत. यावरुन आता भाजप-मनसे यांची युती पक्की समजली जात आहे. (BJP MNS alliance might confirmed after Nitin Gadkari Devendra Fadnavis will also meet Raj Thackeray)

गडचिरोली इथं माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे आणि माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळं आमच्या दोघांची भेट होणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. भेटीनंतर आम्ही कोणत्या विषयावर बोलायचं हे आम्हाला ठरवू द्या. थोडी वाट पाहा, काय होतंय ते तुमच्या लक्षात येईल.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी रविवारी राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर गडकरी यांनी माध्यमांशी संवादही साधला. आमची राजकीय भेट नव्हती. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तसेच त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी मी भेट दिली असं ते म्हणाले.भाजप-मनसे युती पक्की? गडकरीनंतर फडणवीसही घेणार राज ठाकरेंची भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com