पीएचडीच्या मुलाखती 16 नोव्हेंबरपासून! दोन उमेदवार असणार वेटिंगवर

पीएचडीच्या मुलाखती 16 नोव्हेंबरपासून! दोन उमेदवार असणार वेटिंगवर
Solapur University
Solapur University
Updated on
Summary

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पीएचडीच्या तब्बल 900 जागांसाठी 16 नोव्हेंबरपासून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पीएचडीच्या (PhD) तब्बल 900 जागांसाठी 16 नोव्हेंबरपासून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक जागेसाठी तिघांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून दोन उमेदवार वेटिंगवर ठेवले जाणार आहेत.

पीएचडी प्रवेशासाठी घेतलेल्या एन्ट्रन्स टेस्टमधील गुणवत्तेवरून विद्यापीठाने मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात काही मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनही संधी मिळाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील काही उमेदवारांची संधी हुकणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. परंतु, संबंधित उमेदवारास खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातून मुलाखतीसाठी संधी मिळाली आहे. तरीही, त्या उमेदवारांच्या पसंतीनुसार त्यांना त्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्या उमेदवारांनी पसंतीक्रम निवडल्यानंतर दुसऱ्या उमेदवारांना रिक्‍त जागेवर मुलाखीतून प्रवेश दिला जाणार आहे.

Solapur University
संरक्षण मंत्रालयासाठी निघाली गट सी पदांची भरती!

दरम्यान, मुलाखतीसाठी सहाजणांची कमिटी फायनल करण्यात आली आहे. त्यात एक संबंधित विषयाचा प्राध्यापक, दोन विषयतज्ज्ञ, दुसरे दोन तज्ज्ञ (एक बाहेरील व एक मागासवर्गीय), अभ्यास मंडळातील त्या विषयाचा चेअरमन यांचा समावेश आहे. या सहा सदस्यांपैकी किमान तीन सदस्य उपस्थित असले तरीही मुलाखती होणार आहेत. तत्पूर्वी, मुलाखतीसाठी उमेदवार निवडताना काहींना समान गुण मिळाले होते. त्यावेळी विद्यापीठाने स्वतंत्र समिती नियुक्‍त करून त्या उमेदवारांच्या एमएच्या गुणांवरून त्यांची निवड करण्यात आली आहे.

पाच दिवसांत 2700 उमेवारांच्या मुलाखती

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत पीएचडीच्या 900 जागांसाठी उमेदवार अंतिम केले जाणार आहेत. त्यासाठी 16 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवसांत एकूण दोन हजार 700 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा या दोन टप्प्यांत मुलाखती पार पडतील. उमेदवारांच्या सोयीनुसार त्यांना वेळ देण्यात येणार असून, परजिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या राहण्याची सोय विद्यापीठातील हॉस्टेल व गेस्ट हाउसमध्ये केली जाणार आहे.

Solapur University
ISRO मध्ये निघाली 'जेटीओ' पदांची भरती! दरमहा वेतन 1.12 लाख रुपये

पीएचडी मुलाखतीची संपूर्ण तयारी झाली असून, 16 नोव्हेंबरपासून मुलाखतीस प्रारंभ होणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक असणार आहे.

- डॉ. विकास कदम, विशेष कार्यासन अधिकारी, सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com