
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारले जात आहे. स्मारकाजवळ मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर सुमारे १५२ फुटांचा वॉच टॉवर उभारला जात आहे. या कामासाठी १४ कोटी २४ लाख ९२ हजार २३८ रुपयांचा निधी मंजूर असून त्यातील उर्वरित तीन कोटींचा निधी आज (गुरुवारी) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वितरित केला आहे.