
Deputy CM Ajit Pawar addressing party workers, urging them to remain loyal and work to enhance Maharashtra’s prestige.
Sakal
-प्रफुल्ल भंडारी
दौंड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योग्य उमेदवारांसह तरूण व अनुभवींना संधी दिली जाईल. पक्षात प्रवेश करणार्यांना आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो , असे वाटण्याची वेळ मी येऊ देणार नाही. मी कामाचा, स्वच्छतेचा आणि शब्दाचा पक्का माणूस आहे. माझ्या सगळ्या संस्था उत्तम चाललेल्या आहेत. राज्याचा लौकिक वाढविण्यासाठी मला साथ द्या, मी कुठे कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.