
सोलापूर : लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, जिथे संधी मिळेल तिथे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका करणारे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आज अक्षरश: ३६० अंश कोणात फिरल्याचे दिसले. निमित्त जरी नीरेच्या उजव्या कालव्यातील पाण्याचे असले तरीही तब्बल अर्धा तास झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री पवार, आमदार जानकर व राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते उमेश पाटील हे तिघेच होते. या वेळी ना ड्रायव्हर होता, ना पीए होता. अर्धा तासाच्या चर्चेत नक्की काय शिजलंय? याची उत्सुकता आता जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे.