esakal | अजित पवारांना पत्र पाठवलं अन्‌ थेट बजेटमध्येच तरतुद केली (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawars implementation of doctors suggestion in Solapur

डॉ. करंडे हे शेटफळ (ता. मोहोळ) येथील आहेत. त्यांचा हवामान बदलावर अभ्यास आहे. यावर त्यांचे मोठ्याप्रमाणात लेखनही आहे. वेगवेळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे. हवामान बदल शेतीवर कसा बदल करेल, त्याचा शेती व आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

अजित पवारांना पत्र पाठवलं अन्‌ थेट बजेटमध्येच तरतुद केली (Video)

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : सरकारने हे करावे ते करावे, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कोण सरकारला पत्र पाठवतं तर कोण वेगवेगळी आंदोलने करुन आपल्याला वाटतं तसं करण्यास भाग पडावे म्हणून दबावतंत्र वापरते. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील एका प्राध्यपाकांने केला. आणि त्यांना जे सूचलं ते सरकारपर्यंत पोचावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना त्यांनी पत्र लिहलं. याच पत्राची पवार यांनी दखल घेतली व त्यांना मंत्रालयात भेटायला बोलवून त्यांचा विषय काय आहे हे समजून घेतलं. त्यावर थेट अर्थसंकल्पात त्यांनी खास तरतुद केली. ऐवढेच नाही तर अर्थसंकल्पी भाषणात त्याचा पवार यांनी तीनवेळा उल्लेखही केली. हे प्राध्यापक कृषी महाविद्यालयात कार्यरत असून हवामान तज्ज्ञ डॉ. सतीश करंडे आहेत. 
डॉ. करंडे हे शेटफळ (ता. मोहोळ) येथील आहेत. त्यांचा हवामान बदलावर अभ्यास आहे. यावर त्यांचे मोठ्याप्रमाणात लेखनही आहे. वेगवेळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे. हवामान बदल शेतीवर कसा बदल करेल, त्याचा शेती व आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. हवामान बदलाचे कसे संकट आहे हे समजून घेऊन त्यावर सरकारने काय करायला हवे, हे पत्राच्या माध्यमातून त्यांनी पवार यांना कळवले. त्यानंतर पवार यांच्या कार्यालयातून डॉ. करंडे यांना 10- 12 दिवसांनी फोन आला. तेव्हा पवार साहेबांनी आपल्याला भेटण्यासाठी वेळ दिली असल्याचे सांगण्यात आले. डॉ. करंडे यांचा त्यावर विश्‍वास बसेना कारण सरकारला अनेक पत्र येत असतील, त्यात आपला कसा विचार केला, असेल असं वाटु लागले. पण क्षणाचाही विचार न करता त्यांनी होकार दिला आणि पवार यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले. तेव्हा डॉ. करंडे यांनी तयार केलेला प्रस्ताव पवार यांना देऊन सखोल चर्चा झाली. त्याच्यानंतर अर्थसंकल्पात दखल घेऊन त्यांनी 1800 कोटींची तरतुद केली आहे. 

हवामान बदलावर हे सुचवलेले उपाय (थोडक्‍यात)... 

  • - शिक्षण पद्धतीत हवामान बदल आणि आपण हा कोर्स सुरु करावा 
  • - ज्या भागात विद्यार्थी राहतो, त्या परिसराचा अभ्यास करावा 
  • - तज्ज्ञ, डॉक्‍टर यांनी ज्या- त्या भागात मार्गदर्शन करावे 
  • - गावातील वृक्ष, जलस्त्रोत, जलसंधारणाची माहिती जमा करावी 
  • - आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व शेती यावर समन्वय ठेऊन समग्र धोरण असावे 
  • - प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्ये जपत कृषी धोरण असावे 
  • - प्राथमिकपासून महाविद्यालयापर्यंत हवामान बदल व आपण हा विषय असावा
loading image