
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील बहुचर्चित अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस शनिवारी (ता. २) प्रारंभ झाला. नियोजित एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील ६० अतिक्रमणधारकांचे ९१ गाळे काढण्यात आले. बहुतांश लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्याने प्रशासनाचे काम सोपे झाले. या परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवल्याने या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. अभूतपूर्व अशी धाडसी कारवाई नगरपालिकेने केल्याने नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्तेसुद्धा अतिक्रमण मुक्त होऊन मोकळा श्वास घेणार आहेत.