"एकनाथ षष्ठी आणि तुकाराम बीजेला परवानगी देत नसाल तर मरणाला परवानगी द्या !'

Sudhakar Maharaj
Sudhakar Maharaj
Updated on

सोलापूर : संत एकनाथ महाराज षष्ठी आणि तुकाराम महाराज बीजेला महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी. जर महाराष्ट्र सरकार वारकरी संप्रदायाच्या या दोन्ही उत्सवांना परवानगी देणार नसेल, तर किमान मरणाला तरी परवानगी द्यावी, असा रीतसर ई- मेल अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. 

एकीकडे बंडातात्या कराडकर हे ही एकनाथ षष्ठी आणि तुकाराम बीज साजरी करू द्या, या मागणीसाठी आंदोलन करताहेत तर दुसरीकडे अखिल भाविक वारकरी मंडळानेही टोकाची भूमिका घेतली आहे. 

राज्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ षष्ठी आणि तुकाराम बीजेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. 
कोरोना व्हायरसचे सर्व नियम घालून तरी किमान या दोन्ही उत्सवांना परवानगी द्या, अशी मागणी आता वारकऱ्यांमधून जोर धरत असताना पाहायला मिळतं आहे. 

सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, 'कोरोना महामारीचं मोठं संकट जगभर उभा राहिलं होतं. याचा स्वीकार करून वारकरी संप्रदायातल्या सर्व उत्सव व परंपरा थांबवल्या होत्या. परंतु, एक वर्ष होऊन गेलं. आता कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता येत होती. आता सर्व उत्सव व कार्यक्रम आधीप्रमाणे साजरा करता येतील, असा विश्‍वास निर्माण झाला होता. आता शासनाने संत एकनाथ महाराज षष्ठी आणि तुकाराम महाराज बीजेला बंदी घातली आहे.'

'माझा प्रशासनाला प्रश्‍न आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णसंख्याही वाढत आहे. लॉकडाउन करण्याचा विचारही सुरू असताना निवडणुका चालतात, आरक्षण सोडत चालते, विजयोत्सव चालतात, बाजारपेठा खुल्या असलेल्या चालतात, निवडणुकांचा प्रचार चालतो, सभा चालतात, या सर्व गोष्टी चालत असतील तर वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांनाच बंदी का घातली जाते? संत एकनाथ महाराज षष्ठी आणि तुकाराम महाराज बीजेला महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी. जर महाराष्ट्र सरकार वारकरी संप्रदायाच्या या दोन्ही उत्सवांना परवानगी देणार नसाल, तर किमान मरणाला तरी परवानगी द्यावी. कारण आम्हाला आमच्या परंपरा सांभाळायला परवानगी मिळत नसेल तर त्यापेक्षा मरण चांगलं.' 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com