Solapur News : अक्कलकोटचा पोलिस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

पाच हजार रुपयांसाठी अडकला; गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशाची मागणी
akkalkot bribe case police constable trap in acb mobile theft case
akkalkot bribe case police constable trap in acb mobile theft caseSakal

Solapur News : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई दादासाहेब श्रीमंत बोडके याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ५) रंगेहात पकडले.

तक्रारदार वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून पोलिस शिपाई दादासाहेब बोडके याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, असे सांगितले. गुन्हा दाखल होवू द्यायचा नसल्यास पाच हजार रुपये द्यावे लागतील, असेही तो तक्रारदाराला म्हणाला.

त्याला वैतागून तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला व तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी (ता. ५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्कलकोट पंचायत समिती परिसरात सापळा रचला.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका ज्यूसच्या गाड्याजवळ दादासाहेब बोडके याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली. तेथून काही अंतरावर आल्यानंतर अक्कलकोट पंचायत समितीजवळ त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कामगिरी पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अतुल घाडगे, राहुल गायकवाड, पोलिस नाईक स्वामीराव जाधव यांच्या पथकाने पार पाडली.

तक्रारदाराने दुसऱ्याकडून घेतला होता मोबाईल

तक्रारदाराने दुसऱ्या ओळखीच्या व्यक्तीकडून सेकंड मोबाईल विकत घेतला होता. विकणाऱ्याला सोडून विकत घेणाऱ्यालाच गुन्हा दाखल होईल म्हणून पोलिस शिपाई दादासाहेब बोडके याने लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com