Akkalkot–Maindargi Road Accident
esakal
अक्कलकोट : अक्कलकोट- मैंदर्गी रस्त्यावर (Akkalkot–Maindargi Road Accident) पुलावरील लोखंडी कठड्याला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ४) घडली. या अपघाताची नोंद अक्कलकोट उत्तर पोलिस (Police) ठाण्यात झाली आहे.