

Political Clash in Akkalkot: 11 Booked
सोलापूर : ‘मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. २६ नोव्हेंबरला मी व भाऊ सचिन कत्ते दोघे गावातून अक्कलकोटमध्ये गेलो. दुपारी साडेतीनच्या सुमारास मामाच्या दुकानावरून तेथील वृंदावन हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो. यावेळी मीलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, विकास बुळ्ळा यांच्यासह ११ जण तेथे आले. त्यांनी राजकीय वैमनस्यातून मारहाण करून जखमी केले’ अशी फिर्याद ओमप्रसाद प्रकाश कत्ते यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत दिली.
यावरून अक्कलकोटचे नगराध्यक्ष कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य बुळ्ळा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.