

Large-Scale Demolition in Akkalkot Sparks Debate Over Encroachments
sakal
अक्कलकोट: अक्कलकोट नगरपालिकेने बेडर कन्हैया चौक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास आज मोठ्या फौजफाट्यासह आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरुवात केली. या कारवाईत सुमारे १०० खोके तसेच कच्च्या घरांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली, तर काहींची अतिक्रमणे नगरपालिकेने हटविली.