शुन्यातून उभारी घेत सुरू केला क्रेनचा व्यवसाय

मजरेवाडीच्या अक्षय आकुडेची कामगिरी; चौघांना मिळवून दिला रोजगार
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : शुन्यातून विश्‍व निर्माण करण्याची जिद्द असेल तर कोणतीही स्थिती बदलू शकते, असा आत्मविश्‍वास अक्षय आकुडेंनी बाळगला. त्याच जिद्दीने अगदी ‘आयटीआय’च्या शिक्षणाच्या जोरावर त्याने स्वतःची क्रेन खरेदी करून चौघांना रोजगार देऊ केला आहे.अक्षय आकुडे हा मजरेवाडीचा रहिवासी आहे. कुटुंबात त्यांच्या वडिलांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. स्वतःची रिक्षा असल्याने व्यवसायदेखील चांगला चालत होता. अक्षयने बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तो बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. याच कालावधीत अचानक वडील आजारी पडल्याने रिक्षाचा व्यवसाय थांबला. अक्षयने मग आधी कुटुंबाची रोजीरोटी नियमित करण्याचे ठरवले. त्याच्या वडिलांनी त्यास खासगी कंपनीत कामास जाण्याचा सल्ला दिला. अक्षयने इलेक्‍ट्रिक मोटार तयार करणाऱ्या कंपनीत लगेच काम सुरु केले. एक वर्षात हेल्पर म्हणून काम करणाऱ्या अक्षयने कंपनीत सर्व विभागातील यंत्रावर काम करुन त्याचा अनुभव घेतला. यांत्रिकी कामात तो अगदी तयार झाला.

solapur
कऱ्हाड शहराला प्रदूषणाचा विळखा; ठोस उपाययोजनांची गरज

काही दिवसात अक्षयच्या वडिलांची तब्येत सुधारल्याने त्यांनी अक्षयला काम थांबविण्यास सांगितले. तसेच पुढील शिक्षण घ्यावे असे सांगितले. आता शिक्षण घ्यायचे तर मेकॅनिकल पध्दतीचे घ्यावे असे ठरवले. आपल्या हातात एखादे कौशल्य असेल तर आपल्याला कोणतीही नोकरी न करता व्यवसायात स्वावलंबी होता येते असे त्याच्या लक्षात आले. त्याने शासकीय ‘आयटीआय’मध्ये त्याने मेकॅनिकल ड्राफ्टसमन अभ्यासक्रम स्वीकारला. त्यामुळे प्रत्येक मशिनचे डिझाईन व दुरुस्तीचे तंत्र यामध्ये तो तरबेज झाला.

नंतर त्याने बाजारात जेसीबी व क्रेनचे अर्थकारण समजून घेतले. जेसीबीची संख्या जास्त असल्याने व्यवसायाची स्पर्धा खूप अधिक होती. तसेच देखभालीचा खर्च खूप अधिक होता. तेव्हा त्याने क्रेनची कामे करण्यास सुरवात केली. इतरांच्या क्रेनवर तो काम करु लागला. त्यातून त्याने क्रेनची दुरुस्ती, देखभाल व कामाच्या पध्दती समजून घेतल्या. त्यासोबत या कामातून त्याने सहा लाखाचे भांडवल गोळा केले. त्याने ही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरत बॅंकेचे कर्ज घेऊन स्वतःचे क्रेन खरेदी केले. काही दिवसातच अक्षय आकुडे बाजारात आधी केलेल्या कामामुळे व संपर्कामुळे त्याला नवीन कामे मिळवणे अवघड गेले नाही. बाजारात अगदी सहज व्यवसायाला प्रतिसाद मिळू लागला. अक्षयने या कामावर आता चौघांना रोजगार देऊ केला आहे.

solapur
कऱ्हाड शहराला प्रदूषणाचा विळखा; ठोस उपाययोजनांची गरज

ठळक बाबी

  1. आयटीआयचे शिक्षण केले पूर्ण (ITI EDUCATION)

  2. बाजारात जेसीबी व क्रेन व्यवसायाचा घेतला अनुभव

  3. काम करूनच जमा केली क्रेन खरेदीचे डाउन पेमेंट

  4. क्रेनच्या यांत्रिकीचा पूर्णपणे अभ्यास

  5. व्यवसायातून चौघांना दिला रोजगार(employment for four people)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com