शेतीच्या इतिहासात वाजली धोक्‍याची घंटा..! 

शेतीच्या इतिहासात वाजली धोक्‍याची घंटा..! 
Updated on

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) परिसरातील द्राक्षबागांवर अचानक हुमणीच्या किडींनी हल्ला केला. जमिनीतून पिकांच्या मुळ्यांवर आपली उपजीविका करणाऱ्या हुमणीच्या भुंगेऱ्यांनी मात्र द्राक्षबागेवरच हल्ला चढवला. या घटनेमुळे रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या अतिवापरामुळे पर्यावरण धोक्‍यात आल्याची घंटा वाजल्याची शेतीच्या इतिहासात नवी नोंद झाली आहे.


एकरी एक ते दीड हजार रुपये खर्च 
रोपळे (ता. पंढरपूर) परिसरातील मेंढापूर भागातील एप्रिल महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांवर शुक्रवारच्या रात्री हुमणी अळीच्या भुंगेऱ्यांनी द्राक्षबागांवरच हल्ला चढवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रातोरात रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली. त्यासाठी एकरी एक ते दीड हजार रुपये शेतकऱ्यांचे खर्च झाले. 

हेही वाचा : मुंबई, पुण्यात रुग्ण जास्त तरी दारु विक्री, मग सोलापुरात का नाही? 
भुंगेऱ्यांवर काहीच परिणाम नाही 

रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे हुमणीच्या भुंगेऱ्यांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हुमणीचे नर-मादी भुंगेरे साधारण मार्च ते मे महिन्यात बांधावरील कडुनिंब व गुळवेलासारख्या वनस्पतींची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. याच दरम्यान नर-मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगेरे शेताच्या भळींमध्ये शिरून अंडी घालतात. 

ही चिंतेची बाब 
पोषक वातावरण तयार होताच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिकांचे अर्धवट कुजलेले अवशेष व कोवळ्या मुळ्या खातात. त्यामुळे उभी पिके वाळून जातात. सध्या हे भुंगेरे कडुनिंब आणि शेतातील द्राक्षबागांवर मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. रात्रीच्यावेळी हे भुंगेरे द्राक्षबागेची पाने कुरतडून खात आहेत. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जात असतानाच अशा घटना घडू लागल्या आहेत. ही चिंतेची बाब सर्वसामान्यांसमोरही आली आहे. 

अचानक भुंगे पाने खाऊ लागले 
रात्रीच्या अंधारात अचानक भुंगे आमच्या द्राक्षबागेत येऊन बागेची पाने खाऊ लागले. हे भुंगे कोणते आहेत याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे यावर नेमकी फवारणी काय करावी हेच समजत नाही. 
- शिवाजी व्यवहारे, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक, पंढरपूर 

बागेचे कीड व रोगाचे व्यवस्थापन 
आमच्या द्राक्षबागेत आम्ही रासायनिक कीटक व बुरशीनाशकांचा अतिरेक करत नाही. त्यामुळे आमच्या बागेत अद्यापही हुमणीचे भुंगेरे आलेले नाहीत. पर्यावरणाचा समतोल राहील असेच आम्ही बागेचे कीड व रोगाचे व्यवस्थापन करतो. 
- दत्तात्रय भोसले, तज्ज्ञ शेतकरी, सरकोली, पंढरपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fula film
madar film
solapur
Strategic Water Reservation for Drinking
Marathi News Esakal
www.esakal.com