सोलापूर चारनंतर 'लॉक'! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

Lockdown
LockdownEsakal
Summary

कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय दुकानांना परवानगी नाहीच. डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य सरकारने सावध पवित्रा घेत नवे निर्बंध लागू केले आहेत.

सोलापूर : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत असतानाच या विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. तर चिंतेची बाब म्हणजे राज्यात डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य सरकारने सावध पवित्रा घेत राज्यभर नवे निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहणार असून बिगर अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चारपर्यंतच सुरू राहतील, असे नवे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (Municipal Commissioner P. Shivshankar) यांनी काढले आहेत. (all the essential shops in solapur will be open from Monday to friday till 4 pm)

Lockdown
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आणि डेटा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे हे नवे आदेश काढले आहेत. दरम्यान, ज्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांच्याकडे कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्याची वैधता 15 दिवसांसाठी असणार आहे. परवानगी दिलेल्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी कोरोनाचे नियम तंतोतंत पालन करणे बंधनकारक असेल, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, नव्या निर्बंधात विनापरवाना आंदोलन, मेळाव्यांवर निर्बंध घालण्यात आले असून संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्‍तांनी आदेशातून दिला आहे.

Lockdown
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

'असे' आहेत नवे निकष

- मॉल, थिएटर पूर्णपणे राहणार बंद; रेस्टॉरंट, हॉटेल सोमवार ते शुक्रवारी दुपारी चारपर्यंतच उघडी राहतील

- हॉटेल, रेस्टॉरंट यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी चार ते रात्री 11 पर्यंत तर शनिवार-रविवारी सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत पार्सल सेवेला परवानगी

- सार्वजनिक ठिकाणे व उघडी मैदानांना पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंतच परवानगी

- खासगी कार्यालये 50 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत दुपारी चारपर्यंतच उघडी राहतील; शासकीय कार्यालयांना 50 टक्‍केची मर्यादा

- खेळासाठी पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत परवानगी; विवाहासाठी 50 टक्‍क्‍यांची मर्यादा

- सोमवार ते शुक्रवारपर्यंत मेळाव्यांना दुपारी चारपर्यंतच परवानगी; कार्यक्रमाचा कालावधी तीन तासांपेक्षा अधिक नसावा

- बैठकांना 50 टक्‍क्‍यांची मर्यादा तर अंत्यविधीसाठी 20 जणांनाच परवानगी

- चित्रिकरण, बांधकामाच्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्याच्या राहण्याची असावी सोय; दुपारी चारनंतर प्रवासाला बंदी

- कृषी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

- जीम-सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरमध्ये 'एसी' नकोच; 50 टक्‍क्‍यांच्या क्षमतेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडण्यास परवानगी

Lockdown
सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

सायंकाळी पाच वाजल्यानंतर संचारबंदी

डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका आयुक्‍तांनी शहरासाठी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक 50 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत सुरू राहणार आहे. भाजीपाला, फळविक्रेते, फेरीवाल्यांना सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत उघडी ठेवली जाणार आहेत. तर मद्यविक्री सोमवार ते शुक्रवार या काळात दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत. शनिवार-रविवारी घरपोच सेवेला परवानगी आहे. शाळा-महाविद्यालये व कोचिंग क्‍लासेस बंद ठेवली जातील. पाचव्या स्तरातील जिल्ह्यांमधून येणाऱ्या वाहनधारकांकडे ई-पास असणे बंधनकारक आहे. सायंकाळी पाचनंतर शहरात संचारबंदी व जमावबंदी असणार आहे. त्यामुळे दुपारी चारनंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com