
सोलापूर विभागातून सोडण्यात येणा-या रातराणीच्या फे-यापैकी सोलापूर आगारातून केवळ पुणे, नाशिक, ठाणे या तीनच रातराणीच्या फे-या सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु
सोलापूर : कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शहर जिल्हयात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटीची (ST) चाके पुन्हा धावू लागली आहेत. त्यामुळे सोलापूर विभागातून सोडण्यात येणा-या रातराणीच्या फे-यापैकी सोलापूर आगारातून केवळ पुणे, नाशिक, ठाणे या तीनच रातराणीच्या फे-या सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (only three night ST bus have started from solapur depot)

एसटीच्या दररोजच्या फे-यांची संख्या वाढली असून, शिवशाही बस देखील धावताना दिसून येत आहेत. एकंदरीत प्रवाशांचा अनलॉक नंतर एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्याने एसटीची चाके पुन्हा पूर्ववत होत आहेत. लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यासाठी एसटी धावत होती. मात्र अनलॉकमध्ये सर्वसामान्यांचा प्रतिसाद वाढला आहे. एसटी महामंडळाकडून काही शहरातील फे-यांचे नियोजन करण्यात येत आहे. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फे-यांची संख्याही वाढत आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पुणे, ठाणे, कोल्हापूर, नांदेड, उमरगा, बार्शी, अक्कलकोट, वाई, औरंगाबाद, इचलकरंजी, लातूर, मंगळवेढा, पंढरपूर आदी मार्गावार फे-या सुरु झाल्या आहेत.

कोरोनामुळे एसटी महामंडळाबरोबरच खासगी बसच्या उत्पन्नावर देखील मोठा परिणाम झाला आहे. कारण खासगी गाडयांना प्रवासी मिळत नसल्याने बसमालक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे खासगी बसने प्रवास न करता एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्येत वाढत आहे. बहुतांश खासगी बस अजूनही उभ्या आहे. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. खासगी बसचे तिकीटदर जास्त असल्याने प्रवासी तिकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु बहुतांश प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसला प्राधान्य देतात. शहरातून औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, नागपूर या मार्गावर प्रवासासाठी खासगी बस ये-जा करतात.

अनलॉक नंतर एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे सोलापूर आगारातून रातराणीच्या फे-या सुरु करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात आणखीन यामध्ये वाढत करण्यात येणार आहे.
- प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख, सोलापूर
(only three night ST bus have started from solapur depot)