

Alleged Harassment In Love Relationship Transgender Person Dies By Suicide Family Demands Arrest Of Accused
sakal
सोलापूर: प्रेमात धोका दिलेल्या तरुणाच्या छळाला व मारहाणीला कंटाळून सोलापुरातील एका तृतीयपंथीने स्मशानभूमीतच आत्महत्या केली. अभिजित ऊर्फ कोमल हरिबा नागटिळक (वय २३, मूळ रा. धाराशिव) असे त्याचे नाव आहे. विजापूर रोडवरील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या शुभम जाधव या तरुणाच्या त्रासाला कंटाळून कोमलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. कोमलने आत्महत्येपूर्वी शुभमला व्हिडिओ कॉल केला होता, असेही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.