अमेठी जिंकली मोहोळची काय कथा - आमदार सचिन कल्याणशेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Sachin Kalyanshetti

भाजपाच्या बाबतीत अक्कलकोट व मोहोळ ची परिस्थिती सारखीच आहे. मोहोळ मागे का राहिले याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

अमेठी जिंकली मोहोळची काय कथा - आमदार सचिन कल्याणशेट्टी

मोहोळ - भाजपाच्या बाबतीत अक्कलकोट व मोहोळ ची परिस्थिती सारखीच आहे. मोहोळ मागे का राहिले याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. भाजप हा पक्ष कुठल्याही नेत्यावर अवलंबून नाही, अमेठी जिंकली मोहोळची काय कथा मात्र त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी केलेली सर्वसामान्यांसाठीची कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, सेवा पंधरवाडा प्रामाणिकपणे राबवा जनतेपर्यंत पोहोचण्याची ती एक मोठी संधी आहे असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

आमदार तथा जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच मोहोळ येथे आले होते, त्यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील विविध कामाचा व सद्य परिस्थीतीचा आढावा घेतला.यावेळी माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश घोडके, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, सतीश पाटील, सतीश काळे, अंकुश अवताडे, संजीव खिलारे, रमेश माने, नागेश क्षीरसागर, दिलीप गायकवाड, मुजीब मुजावर, बाबा जाधव, बाळासाहेब पवार, शशिकांत चव्हाण, श्री बिराजदार, लिंगदेव निकम, फंटू गोफणे, विष्णू चव्हाण, गणेश झाडे, सागर लेंगरे, यशवंत नरूटे, आदी सह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी पुढे म्हणाले, मोहोळ हा लढवय्यांचा व संघर्षाचा वारसा असलेला तालुका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारावर विश्वास ठेवून पक्षात येणाऱ्या चे स्वागतच आहे. जिथे भाजपा कमी आहे त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालणार आहे. पुढचा मोहोळचा आमदार हा भाजपचाच असेल मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याच बैठकीत अनेक नागरिकांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी आणला, मात्र रस्ते आहे तसेच आहेत अशी तक्रार केली त्यावर जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी त्या कामाचा जो कोणी ठेकेदार असेल त्याच्या कामाची चौकशी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री ढोबळे, विजयराज डोंगरे, सुनील चव्हाण, शंकर वाघमारे, श्री बिराजदार यांनी मनोगते व्यक्त केली. आभार माजी मंत्री ढोबळे यांनी मानले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी मोहोळ तालुका हा विकासा पासून कोसो दूर आहे. खासदार फंडातून रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा, सत्ताधारी तोंडे बघून निधी देत आहेत असा आरोप केला.

Web Title: Amethi Winning Mohol Mla Sachin Kalyanshetty Bjp Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpmoholMLAwinner