
Navaratri 2025
Sakal
सांगोला : गरब्याचे आयोजन केल्याने महिलांना नृत्य आणि पारंपरिक कला सादर करण्याची संधी मिळते. यातून त्यांचे कलागुण प्रदर्शित होतात तसेच त्यांना प्रोत्साहन मिळते. महिलांना एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी हे एक सुरक्षित आणि आनंदी व्यासपीठ ठरते. यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळून समाजात महिलांच्या कलागुणांना महत्त्व प्राप्त होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.