

Ancient Nilkantheshwar Temple Near Mohol Could Become A Major Religious Tourism Destination With Heritage Conservation
sakal
-चंद्रकांत देवकते
मोहोळ : प्राचीन काळी ‘चंद्रमौळी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्याचे मोहोळ शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर पंढरपूर रस्त्यालगत, चंद्रमौळी गणपती मंदिराच्या समीप प्राचीन हेमाडपंथी नीलकंठेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील कलाकुसरीचे दगडी खांब, नक्षीदार शिवपिंड आणि गर्भगृहातील विरक्तीकडे घेऊन जाणारी नीरव शांतता भाविक व पर्यटकांना मोहिनी घालते. मंदिराच्या परिसरात देवीचे व भैरवनाथाच्या मंदिराचे भग्नावशेष आजही इतिहासाची साक्ष देतात.