

Shivaji Era Stone Vessel Discovered at Pandharpur Vitthal Temple
sakal
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यादरम्यान मंदिरांमध्ये ४०० वर्षांपूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण सापडला आहे. हा रांजण विठ्ठल भक्त माणकोजी बोधले यांनी १६४० मध्ये बाजीराव पडसाळीमध्ये बसवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या जुन्या दुर्मिळ अशा पाषाणापासून तयार केलेल्या रांजणाची पुनर्स्थापना याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.