esakal | आंध्र प्रदेश, तेलंगणातील मजुरांचा मुक्काम वाढण्याची शक्‍यता 
sakal

बोलून बातमी शोधा

Andhra Pradesh Telangana workers stay is likely to increase

दोन राज्यांचा हिरवा कंदील नाही 
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील काही मजूर या भागात आहेत. या दोन्ही राज्यातील मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु, दोन्ही राज्यातील संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अजून तरी त्यांच्याकडून तसा कोणताही हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे या दोन राज्यातील मजूरांचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आंध्र प्रदेश, तेलंगणातील मजुरांचा मुक्काम वाढण्याची शक्‍यता 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अडकून पडलेल्या विविध राज्यातील सुमारे 500 परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांची तपासणी करुन त्यांना त्यांच्या गावी पाठवले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी आज सकाळशी बोतलाना दिली. दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांनी अजूनही त्यांच्या मजुरांना आपल्यात राज्यात घेण्यास हिरवा कंदिल दाखवला नाही. त्यामुळे या दोन राज्यातील मजुरांचा आणखी काही दिवस मुक्काम वाढण्याची शक्‍यता आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे आणि एसटीची प्रवाशी वाहतूक बंद असल्याने कामाच्या निमित्ताने विविध राज्यातून पंढरपूर शहर व तालुक्‍यात आलेले परप्रांतीय मजूर गेल्या दीड महिन्यांपासून अडकून पडले आहेत. या सर्व मजुरांना येथील प्रशासनाच्या वतीने राहाण्याची व भोजणाची व्यवस्था केली आहे. यासाठी ग्रामीण व शहरातील अनेक लोकांनी मदत देखील केली आहे. 
आज खेडभोसे येथील साखर कामगार नेते बंडू पवार, कालिदास साळुंखे, सुधीर पवार, धनाजी साळुंखे, सरपंच सज्जन लोंढे यांच्या वतीने केंद्रेकर महाराज मठातील परप्रांतीयांसाठी एक क्विंटल तांदुळ, एक क्विंटल भाजीपाला तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या उपस्थित मोफत देण्यात आला. यावेळी त्यांनी तालुक्‍यातील परप्रांतीय मजूराविषयीची माहिती दिली. 
देशभरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे परराज्यातील मजूरांना आता त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार पंढरपूर तालुक्‍यात असलेल्या सुमारे 500 परप्रांतीय मजूरांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व मजूरांची तपासणी केली जाणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन दिवसात या सर्व मजुरांना त्यांच्या गावी सोडले जाणार आहे. त्या-त्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही यावेळी तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी सांगितले. 

loading image