
सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग २०२५-२६ पासून करणार आहे. अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल, यादृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.