
-संतोष पाटील
टेंभुर्णी : आर्थिक परिस्थिती हलाखीची अशात नातवाच्या एका डोळ्यात पूर्ण पिकलेला मोतिबिंदू तर दुसऱ्या डोळ्यात अपरिपक्व मोतीबिंदू झाल्याने दृष्टीचा दिवा विझण्याचीशक्यता निर्माण झालेली त्यामुळे वयोवृद्ध आजीची उपचारासाठी धडपड सुरू होती. टेंभुर्णीतील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ.आनंदराव खडके यांच्याकडे नातवाला घेऊन आल्यानंतर घरातील उरलेल मोजके दागिने विकून उपचार करणार असल्याचा मनोदय व्यक्त करताच ' आजी तुम्ही दागिने विकू नका उपचाराची सर्व जबाबदारी आमची आहे ' असे म्हणून डाॅ आनंदराव खडके व त्याच्या सहकार्यांनी एक पैसाही न घेता मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह सर्व उपचार मोफत करून नातवाचे जीवन प्रकाशमय केले.