लसीकरणाचा लाभ मिळत नाही तर केंद्र कशासाठी? मंगळवेळेकरांचा संतप्त सवाल

मंगळवेढा तालुक्‍याला लसीकरणाचा लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे
Vaccine
VaccineMedia Gallery

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना (Covid-19) साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता 18 ते 44 वयोगटातील तरुणांना लसीकरणाचे (Vccination) नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पळापळ होत असून तालुक्‍यातील लसीकरण केंद्र नावालाच आहे. ऑनलाइन नोंदणीचा लाभ मात्र इतर ठिकाणच्या लाभार्थींना मात्र मिळत असल्यामुळे संताप व्यक्त होऊ लागला असून, लसीकरणाचा लाभ प्रत्यक्ष कधी होणार, असा सवाल मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यातील जनतेतून विचारला जात आहे. (Anger is being expressed that Mangalwedha taluka is not getting the benefit of vaccination)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक वेगाने पसरला. त्यातच पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्यामुळे त्या संसर्गाला अधिक वाव मिळाला. सर्वसामान्य नागरिकांतून दुसऱ्या लाटेबद्दल भीतीचे वातावरण पसरले. अशा परिस्थितीत नागरिकांचा ओढा लसीकरणाकडे लागला. परंतु शासनाने यापूर्वी 45 वर्षांच्या पुढील वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली. परंतु तालुक्‍यात मरवडेसाठी एक हजार लसी दोन दिवसांपूर्वी शासनाने उपलब्ध केल्याचे सांगितले; परंतु यामधील 500 लसी बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वर्ग करण्यात आल्या.

Vaccine
कोरोनाबाधित आजोबाच्या मृत्यूची गावभर चर्चा ! मात्र कोरोनाशी झुंज देऊन ते पोचले गावात

सध्या ऑनलाइन नोंदणी करताना तालुक्‍यापेक्षा बाहेरच्या लोकांना अधिक लाभ मिळत असल्याचे ऑनलाइन नोंदणीवरून दिसून येत आहे. लॉकडाउनमुळे बरीच ऑनलाइन केंद्रे बंद आहेत त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना सध्या तर ग्रामीण भागातील अशिक्षित कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणे मुश्‍कील बनले आहे. ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, ते मोबाईलधारक त्यांच्या कुटुंबाचाच फक्त विचार करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विचार कोण करणार, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध केली आहे, त्या लसींचा लाभ या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांना उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी केले.

नूतन आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या असल्या तरी, प्रत्यक्षात लसीकरणाबाबतीत निवडणुकीमुळे तालुक्‍याला अधिक गती देण्याची आवश्‍यकता असून, योग्य समन्वय करून लसीकरणाचा लाभ तालुक्‍यातील जनतेलाच कसा होईल याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. लसीकरणाचा योग्य कालबद्ध कार्यक्रम ठेवण्याची मागणी तालुक्‍यातील नागरिकांतून होत आहे.

Vaccine
जिल्ह्यासाठी मिळाले लसीचे 12 हजार डोस ! शहर व ग्रामीणसाठी 'असे' झाले नियोजन

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मंगळवेढ्याचा समावेश नव्हता. याबाबत पाठपुरावा करून केंद्र सुरू केले. त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक गावाला लस देण्याबाबत चर्चा झाली; परंतु काल साडेचारनंतर पोर्टल ओपन केल्यानंतर नोंदणी मात्र इतर ठिकाणची झाली. वाढत्या कोरोनाचा विचार करता येथील लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. जर येथे लाभ द्यायचा नसेल तर लसीकरणाची केंद्रे कशासाठी या ठिकाणी सुरू करता? लोकांच्या रोषाला आम्हाला नाहक सामोरे जावे लागत आहे. आरोग्य खात्याचे अधिकारी फोन उचलण्याच्या बाबतीत सकारात्मक नाहीत.

- नितीन नकाते, जिल्हा परिषद सदस्य, बोराळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com