नाराज गणेश मूर्तिकार देणार पीओपी बंदीसंदर्भात न्यायालयीन लढा !

नाराज गणेश मूर्तिकार देणार पीओपी बंदीसंदर्भात न्यायालयीन लढा !
Ganersh Murtikar
Ganersh MurtikarCanva
Updated on

परराज्यात उत्सवांवर जास्त निर्बंध नसणार हे गृहीत धरून सोलापूरचे मूर्तिकार चार फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती बनवत आहेत.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरली तरी तिसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेऊन राज्य शासनाने गणेशोत्सवासंदर्भात निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक उत्सवांबाबत थोडी शिथिलता मिळाली तरी मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध कायम ठेवल्याने मूर्तिकार नाराज आहेत. पीओपी बंदीबाबत राज्यस्तरीय मूर्तिकार संघटनेतर्फे शासन, हरित लवाद व न्यायालयात दाद मागण्यात येत आहे. (Angry Ganesh sculptor to give court battle over POP ban)

Ganersh Murtikar
अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी !

गतवर्षी कोरोना आपत्तीबरोबरच पीओपी मूर्ती बंदीचे विघ्न गणेश मूर्तिकारांवर होते. लॉकडाउन (Lockdown) काळात मूर्ती बनविण्यास परवानगी मिळावी याबाबत मूर्तिकारांना बराच संघर्ष करावा लागला. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी, घरगुती मूर्तीची उंची दोन व सार्वजनिक मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नको असे निर्देश शासनाने दिले होते. याचा मूर्तिकारांना जबर फटका बसला. महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांत निर्बंध वेगवेगळे असल्याने मूर्तिकार यंदा सजगपणे काम करीत आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातून सोलापुरातील गणेशमूर्तींना मागणी असते. परराज्यात उत्सवांवर जास्त निर्बंध नसणार हे गृहीत धरून सोलापूरचे मूर्तिकार चार फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती बनवत आहेत. राज्य शासनाने चार फुटांहून जास्त उंचीच्या मूर्तींना परवानगी द्यावी, अशी मूर्तिकारांची मागणी आहे. दरम्यान, पीओपी मूर्ती बंदीविरोधात मूर्तिकार संघटनांनी लोकप्रतिनिधी, शासनाकडे गतवर्षी दाद मागितली होती. त्यावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंदीला तूर्त स्थगिती देत तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल मागवला आहे. हा अहवाल अद्याप शासनाकडे आला नाही. तो येईपर्यंत मूर्तिकारांवर टांगती तलवार कायम राहणार आहे.

Ganersh Murtikar
तिसऱ्या लाटेच्या नियोजनात सोलापूर पुढे - सीईओ स्वामी

100 मूर्तिकार, 1500 कारागीर

सोलापूर शहरात 100 गणेश मूर्तिकार असून, प्रत्येकाकडे किमान 10 ते 15 कारागिरांची संख्या लक्षात घेता सुमारे दीड हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाच्या निर्बंधामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गतवर्षीच्या चार फुटांहून अधिक उंचीच्या तयार मूर्ती जागेवरच आहेत. यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा उत्सवावरील निर्बंधांत थोडी शिथिलता मिळाली आहे. गतवर्षी सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करणे वा मंडपास मनाई होती. यंदा सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

गतवर्षी कोरोना आपल्याला नवीन होता. या महामारीवर लसीकरणाचा उपाय असताना शासनाने उत्सवावरील निर्बंध जवळपास कायम ठेवले आहेत. लसीकरणाच्या अटीवर उत्सवास परवानगी देणे आवश्‍यक आहे. नियमाच्या अधीन राहून गणेश मंडळे उत्सवास तयार आहेत. मूर्तीवरील निर्बंध कायम ठेवल्याने यंदादेखील मूर्तिकारांना फटका बसणार आहे.

- अमरनाथ कनकी, अध्यक्ष, सोलापूर मूर्तिकार असोसिएशन

शासनाच्या निर्बंधांना यंदाही गणेश मंडळे व मूर्तिकारांना सामोरे जावे लागणार आहे. पीओपी बंदीबाबत राज्यस्तरीय मूर्तिकार संघटनेतर्फे शासन, हरित लवाद व न्यायालयात दाद मागण्यात येत आहे. पीओपीमुळे प्रदूषण होत नाही असा एका तज्ज्ञाचा निष्कर्ष आहे. तेव्हा पीओपी मूर्तीवरील बंदी मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

- विजय मद्दा, गणेश मूर्तिकार, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com