Solapur News : चारा छावणीच्या बिलासाठी शिरापूरचे अनिल पाटील निघाले पायी मंत्रालयाकडे

हा 375 किलोमीटरचा हा प्रवास असून 17 ते 18 दिवस मुंबईला पोहोचायला लागतील
Anil Patil of Shirapur went to meet cm eknath shinde at mumbai
Anil Patil of Shirapur went to meet cm eknath shinde at mumbai sakal

मोहोळ : सन 2019 मध्ये चालविलेल्या चारा छावणीचे बिल शासनाने अद्यापही आदान न केल्याने शिरापूर ता मोहोळ येथील छावणी चालक अनिल आबाजी पाटील हे मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व न्याय मागण्यासाठी एक मे या महाराष्ट्र दिना पासुन पायी निघाले आहेत.

हा 375 किलोमीटरचा हा प्रवास असून 17 ते 18 दिवस मुंबईला पोहोचायला लागतील असे पाटील यांनी सांगितले. अंगात पांढरा शर्ट घालून मागेपुढे कशासाठी मुंबईला चाललो आहे याचा फलक लावला आहे. हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सन 2019 मध्ये पाटील यांनी चारा छावणी सुरू केली होती वारंवार अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लेखी पत्र व्यवहार करूनही चारा छावणीचे बिल शासनाने अदा केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

ता 1 मे रोजी पंढरपूर येथील नदीत स्नान करून, विठुरायाचे दर्शन घेऊन, लोटांगण घालून त्यानी मुंबईकडे कुच केली आहे. यापूर्वी हा त्यांनी मुंबईला जाऊन समक्ष भेटून कैफियत मांडली होती. मात्र जो तो हात झटकून रिकामा होतोय आमच्या हातात काही नाही वरच्या लेवल चा हा विषय आहे असे सांगितले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेलपाटे मारून कंटाळलेल्या पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल यांना इच्छा मारण्याची ही परवानगी मागितली होती. चारा छावणीत मोठा भ्रष्टाचार होतो म्हणून आपण शासनाला चारा छावण्या सुरू करू नका त्या ऐवजी 50 रुपये एका जनावराला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या असा तोडगा सुचविला होता, त्यासाठी आंदोलन ही केले होते मात्र त्याची कोणीही दखल घेतली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

पहाटे लवकर उठून चालणे सुरू करतो, बारा वाजेपर्यंत चालतो नंतर सायंकाळी सहा वाजता चालणे सुरू करतो असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान माझ्या चारा छावणी बाबत काही शंका किंवा भ्रष्टाचार वाटत असेल तर कुठल्याही सक्षम संस्थे मार्फत वा एखाद्या लेखापरीक्षका मार्फत चौकशी करा, दोष आढळला तर मला पैसे देऊ नका, नाही आढळला तर मात्र व्याजासह पैसे द्यावे लागतील अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com