

A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
Sakal
मंगळवेढा : मंगळवेढा आगारातील जुन्या व वारंवार नादुरुस्त होणाऱ्या एस.टी. बसेसमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने खास बाब म्हणून तातडीने ५ नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाव्दारे भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी केली.