

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे अनेक वर्षे डोक्यावर जटा बाळगून मरणयातना सहन करणाऱ्या एका महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी यशस्वी समुपदेशन करून जटा मुक्त केली आहे. या धाडसी निर्णयामुळे संबंधित महिला आता जटांच्या त्रासातून आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त झाली.