
सोलापूर: एआय प्रणालीद्वारे साकारलेली साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची सहा छायाचित्रे, जातिनिर्मूलनाचा संदेश देत वैचारिक प्रबोधन करणारे देखावे, साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे देखावे अशा विविध देखाव्यांसह तरुणाईच्या जल्लोषाने रविवारी (ता. ३) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या.