
पांगरी : पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील ११ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूचा मोठा साठा काल परवानगी घेऊन नष्ट करण्यात आला. एकूण १ लाख ३६ हजार ७७३ रुपयांचा मुद्देमाल काल (ता. १५) मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शनानुसार नष्ट करण्यात आला.