
श्रीपूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 390 वर पोचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या अकलूजमध्ये असून अकलूजची बाधित रुग्णसंख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोचली आहे. तालुक्यात आजअखेर 390 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 146 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 239 रुग्ण उपचार घेत आहेत. या वाढत्या आकडेवारीमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
एकट्या अकलूज शहरात आज (शनिवारी) अखेर कोरोना रुग्णांची संख्या 97 झाली आहे. या वाढत्या संख्येने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी अकलूज ग्रामपंचायत सुरवातीपासूनच भरपूर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही अकलूजमध्ये रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर गेली आहे. तालुक्यात आढळून आलेल्या 390 पैकी 146 रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. 239 रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. आजअखेर उपचार घेताना पाचजणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अकलूज येथील खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या सांगोला व पंढरपूर तालुक्यातील दोन कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अकलूजमध्ये महर्षी कॉलनी, रामायण चौक, व्यंकटनगर भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे येथील नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. संपर्क समूहामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रकार येथे वाढत असल्यामुळे आरोग्य विभागापुढील चिंता वाढली आहे.
आजपर्यंत माळशिरस तालुक्यात गावनिहाय आढळलेल्या बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे : यशवंतनगर 25, वेळापूर 34, विझोरी 21, श्रीपूर 6, माळशिरस 7, बोरगाव 14, संग्रामनगर 19, उघडेवाडी 2, माळीनगर 26, एकशिव 3, कोंडभावी 1, माळेवाडी 4, शिंदेवाडी 5, निमगाव 1, सदाशिवनगर 13, नातेपुते 17, गुरसाळे 2, फळवणी 2, मांडवे 4, गिरवी 1, महाळुंग 24, वाफेगाव 5, लवंग 13, उंबरे (वे) 2, सवतगव्हाण 14, धर्मपुरी 4, माळखांबी 9, फोंडशिरस 2, दहीगाव 1, खंडाळी 3, चाकोरे 1, तांदूळवाडी 1, माळेवाडी 4, गिरझणी 1, कन्हेर 2, नेवरे 5.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.