Akkalkot Road School incident: मुलगी अक्कलकोट रोडवरील ‘एसव्हीसीएस’ शाळेत, आईचा फोन लागत नव्हता, चेहऱ्यावर चिंता अन् काय घडलं!

tudent distress due to unreachable guardian case: चुकीच्या केंद्रावर पोचलेल्या विद्यार्थिनीला डॉ. अरुंधती हराळकर व टॅक्सीचालकाची वेळेवर मदत; अवघ्या काही मिनिटांत योग्य ‘नीट’ केंद्रावर पोहोचल्याने वर्ष वाचले
Concerned schoolgirl at SVCS after failing to reach her mother on phone.

Concerned schoolgirl at SVCS after failing to reach her mother on phone.

sakal

Updated on

सोलापूर : ‘नीट’साठी एक मुलगी अक्कलकोट रोडवरील ‘एसव्हीसीएस’ शाळेत पोचली होती. पण तिचे केंद्र भवानी पेठेतील ‘एसव्हीसीएस’ शाळेत होते. दुपारी दीड वाजता परीक्षा केंद्राचे गेट बंद होणार होते आणि त्या मुलीच्या आईचा फोन लागत नव्हता. अशा संकटसमयी मुलीच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ. अरुंधती हराळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मुलाला सोडायला आलेल्या टॅक्सी चालकाला सांगून ‘ती’ला तातडीने भवानी पेठेतील शाळेत सोडले. अवघ्या पाच मिनिटांत मुलीला केंद्रावर सोडले आणि तिला परीक्षा देता आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com