कंदलगावात शिक्षणाची गंगा ! ग्रामीण मुलांच्या टॅलेंटला दाखविला अपर्णा शेजाळ यांनी ध्येयाचा मार्ग

Aparna Sejal from Kandalgaon has started an Indian Public School.jpg
Aparna Sejal from Kandalgaon has started an Indian Public School.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांनाही इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने अपर्णा शेजाळ यांनी कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील माळरानावर जून 2010 मध्ये पत्र्याच्या चार खोलीत इंडियन पब्लिक स्कूल सुरु केली. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता स्वस्तात दर्जेदार शिक्षण, या तत्त्वानुसार त्यांनी पतीच्या साथीने शिक्षणातून विद्यार्थ्यांची प्रगती हे ध्येय ठेवले. आता त्याठिकाणी शाळेची मोठी इमारत उभी असून तब्बल दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मोठमोठ्या शिक्षण संस्था, भरमसाठ फी असलेल्या खासगी शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षण घेणे शक्‍य होत नाही. कंदलगाव परिसरातील मुलांना उच्च शिक्षणासाठी मंद्रूपसह अन्य ठिकाणी जावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर दुर्लक्षित ग्रामीण भागातील मुलांच्या टॅलेंटला ध्येयाचा मार्ग दाखवून त्यांची प्रगती साधण्याच्या उद्देशाने शेजाळ यांनी अनेकांचा विरोध डावलून कंदलगावात शाळा सुरु केली.

प्रारंभी नर्सरी, त्यानंतर नर्सरी ते दहावी 2015 पासून अकरावी-बारावी विज्ञान शाखा आणि आता बीएससीचे वर्ग त्याठिकाणी सुरु आहेत. शेजाळ यांच्या अक्षर ज्यु. कॉलेजमधील एका मुलाने सीईटी परीक्षेत एकाने 98 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविले. तर तीन विद्यार्थी 'बीएएमस'साठी पात्र ठरले आणि एक मुलगी टर्कीला 'एमबीबीएस'साठी गेली आहे. दुसरीकडे उसतोडीच्या निमित्ताने काहीकाळ येणाऱ्या कामगारांच्या मुलांनाही शेजाळ यांनी शिक्षणाची गोडी लावली. संस्कृती जतन व्हावी म्हणून प्रत्येक धर्मांचे सण-उत्सवानिमित्त शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणाबरोबरच या शाळेत विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्येही नावलौकिक मिळविला असून शेजाळ यांचा स्वत:चा मुलगाही याच शाळेत बारावीचे शिक्षण घेत आहे.

शाळेसंबंधी ठळक बाबी

- नर्ससी ते बीएससीपर्यंत इंग्रजी माध्यमातून (सीबीएसई पॅटर्न) शिक्षणाची कंदलगावात सोय
- बीएएमएस, एमबीबीएससाठी काही विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश; गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाहीच
- वाड्या-वस्त्यांवरील मुलांसाठी स्कूलबसची सोय; दरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
- हरवलेल्या वस्तू अथवा पैशातून गरीब विद्यार्थ्यांना केली जाते शैक्षणिक मदत
- बारावीनंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे घेतले जातात जेईई, एनईईटी, सीईटीचे मोफत क्‍लासेस

दर्जेदार शिक्षणाची मिळाली संधी

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मंद्रूप, सोलापूर या ठिकाणी जावे लागत होते. मात्र, इंडियन पब्लिक स्कूल आणि अक्षर ज्युनिअर कॉलेज सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळू लागल्याने एकही विद्यार्थी दुसरीकडे शिकायला जात नाही.
- अण्णासाहेब पाटील, पालक, वडापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Rain
Solapur Cyber Fraud
radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
Pune Teachers Constituency
Marathi News Esakal
www.esakal.com