गुन्ह्यांबाबत तपास अधिकारीच अनभिज्ञ ! रात्रीच्या संचारबंदीतही वाहनांची वर्दळ

433Police_58.jpg
433Police_58.jpg

सोलापूर : शहरात सात पोलिस ठाणे असून गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्याकडे तपास दिला जातो. मात्र, अनेकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनाही माहिती नसते की, या गुन्ह्याचा तपास आपल्याकडे देण्यात आला आहे.

रात्रीच्या संचारबंदीतही 
शहरात वाहनांची वर्दळ

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात यावा या हेतूने शहर-जिल्ह्यात 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळेत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कोणत्याही व्यक्‍तीस घराबाहेर पडता येणार नाही, असे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांच्या आदेशात नमूद आहे. पहिल्या टप्प्यात 7 मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, आता सात रस्ता, जुना पुना नाका यासह ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढलेली असतानाही काहीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


न्यायालयीन कामकाजासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांकडे अथवा सुट्टी दिवशी घरी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या परस्परच तपास त्यांच्याकडे सोपविला जातो. गुन्ह्याचा तत्काळ आणि सखोल तपास करण्यासाठी त्या अधिकारी, कर्मचाऱ्याला वेळ मिळायला हवा. मात्र, अचानकपणे, कोणतीही माहिती न देता एखाद्या कर्मचाऱ्याचे नाव त्या गुन्ह्याच्या तपासासाठी दिले जाते. याबद्दल अनेकांनी 'सकाळ'कडे नाराजी व्यक्‍त केली असून अशा प्रकारांबाबत पोलिस आयुक्‍त हे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय सूचना करतील, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

घरफोड्या करणाऱ्यांसह 
दुचाकी चोरणारे पाचजण जेरबंद

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले होते. या पार्श्‍वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाचजणांना अटक करून त्यांच्याकडील दोन दुचाकी, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व 32 तोळे चांदीचे दागिने, दोन इलेक्‍ट्रिक मोटारी, असा एकूण दोन लाख आठ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


घरफोडीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष मच्छिंद्र चव्हाण (रा. तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) हा मल्लिकार्जून नगरातील मोकळ्या मैदानात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्री. खांडेकर यांनी त्या परिसरात सापळा लावला. मात्र, त्याला संशय आल्याने तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी घरफोडीतील साडेतीन तोळे सोने, 32 तोळे चांदीचे दागिने, असा एकूण 63 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ईसाक उर्फ डॅनी कय्युम शेख हा मरहबा मॉल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यालाही पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याबरोबर हमीद गफार जमादार (दोघेही रा. शोभादेवी नगर, देसाई कारखान्याजवळ) हादेखील होता. त्यांच्याकडून पोलिसांनी 40 हजार रुपयांच्या दोन मोटारपंप जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरी करणारा संशयित आरोपी कमटम वसाहतीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनाही पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. खांडेकर, सचिन माळी, पोलिस हवालदार महेश शिंदे, सतेज शिंदे, श्री. पवार, काळे, यादव, गायकवाड, याळगी, वाघे, मुंढे, जाधव, घोडके यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com