esakal | एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

sakal_logo
By
दिनेश देशमुख

बोंडले : नीती आयोगाला पुढे करून केंद्र व राज्य सरकारने ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे कट कारस्थान रचल्याने याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. यामुळे या एफआरपीच्या होणाऱ्या तीन तुकड्यांच्या विरोधात माळशिरस तालुक्‍यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांच्यावतीने मिस्ड्‌ कॉलचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सोलापूर: विसर्जन दिवशी गणेश मूर्ती संकलनासाठी शहरात शंभर केंद्रे

उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र व राज्य सरकारच्या आडून केला असून, यामुळे सर्वाधिक रिकव्हरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता टनाला 1680/-तर इतर जिल्ह्यात 1320/-रूपये मिळणार आहे. तसेच दुसरा हप्ता ऊस गाळपाचा हंगाम बंद होताना तर तिसरा हप्ता पुढील वर्षीचा हंगाम सुरू होताना मिळणार आहे.

एफआरपीच्या तुकड्यांमुळे तटपुंज्या हप्त्यातून बॅंकांचे पीक कर्जाचे हप्ता वजा जाता कमीत कमी रोकड शेतकऱ्यांच्या हातात मिळणार आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपीचे कायदेशीर कवचच शासन काढून घेणार आहे. याकरिता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपीच्या तुकड्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या मिस्ड्‌कॉल आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अजित बोरकर यांनी केले आहे.

या मिस्ड्‌ कॉल आंदोलनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ता. 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान (8448 183 751) या क्रमांकावर मोबाईलद्वारे मिस्ड्‌ कॉल द्यावयाचा आहे. या मोहिमेतून मिळालेल्या डेटाचा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापर करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी आपले भविष्य अंधारमय होण्याअगोदर जागरुक होऊन या मिस्ड्‌ कॉल आंदोलनात सहभागी होऊन दिलेल्या नंबरवरती मिस्ड्‌ कॉल देतील, अशी अपेक्षा अजित बोरकर यांनी व्यक्त केली आहे.

loading image
go to top