esakal | सोलापूर: विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती संकलनासाठी शहरात शंभर केंद्रे
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh visarjan

सोलापूर: विसर्जन दिवशी गणेश मूर्ती संकलनासाठी शहरात शंभर केंद्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी विभागीय कार्यालयनिहाय शहरात शंभर ठिकाणी संकलन केंद्राची उभारणी केली आहे. याठिकाणी परिसरातील नागरिकांनी मूर्तींचे संकलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावे, असे आवाहन आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

हेही वाचा: 80 वर्षांच्या आजोबाला नातवानेच घातला साडेतेरा लाखांचा गंडा!

शहरातील मूर्ती संकलनासाठी संबंधित विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ. कोटणीस स्मारक, जलतरण तलाव, समाज मंदिर, कॉलेज, मंगलकार्यालय, मंदिरे आदी ठिकाणांची निवड केली आहे. प्रत्येक विभागातील कार्यालय परिसरातील कमीत कमी 9 ते अधिकाधिक 20 केंद्राची उभारणी केली आहे.

या प्रतिकेंद्रावर मूर्ती संकलनासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. संभाजी तलाव आणि श्री सिध्देश्‍वर तलावात मूर्ती विसर्जनासाठी बंदी असून, शहरातील विविध ठिकाणच्या विहिरी व खाणीमध्ये महापालिकेच्या यंत्रणेकडून विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनाकरिता 80 आयशर टेम्पो तसेच विविध कामांसाठी 453 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. नागरिकांनी "श्रीं'च्या मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्रावर आणून द्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्‍तांनी केले आहे.

विभागीय कार्यालय एक - 19 केंद्रे

विभागीय कार्यालय दोन - 12 केंद्रे

विभागीय कार्यालय तीन - 9 केंद्रे

विभागीय कार्यालय चार - 13 केंद्रे

विभागीय कार्यालय पाच - 13 केंद्रे

विभागीय कार्यालय सहा - 7 केंद्रे

विभागीय कार्यालय सात - 7 केंद्रे

विभागीय कार्यालय आठ - 20 केंद्रे

loading image
go to top