HSC Result : शिकवणी न लावता रजियाची बारावीत बाजी, ८६ टक्के गुणांनी उत्तीर्ण; महाविद्यालयासह आई-वडिलांनी केली मदत..
दहावीनंतर दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या रजिया हिने अकरावीला ९३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिला क्रमांक मिळविला. त्यामुळे शिक्षकांनी तिला पुस्तके, मार्गदर्शक पुस्तिका व प्रश्नसंच आदि शैक्षणिक साहित्यांची मदत केली.
Razia Mulla from Arali, a symbol of dedication and self-reliance, scores 86% without tuition.Sakal
सोलापूर : इयत्ता बारावीचे वर्ष म्हटले की विद्यार्थी खासगी क्लास (शिकवणी वर्ग) लावतात. मात्र, ग्रामीण भागातील रजिया मुल्ला हिने खासगी क्लास न लावता ८६.५० टक्के गुण मिळवून दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवले आहे.